साडेतीन पीठ देवीची आरती
जयदेवी जयदेवी जय दुर्गा परमेश्वरी .कृपादृष्टी तुझी भक्तावरी वास तुझा राहे भक्ता घरी ii
सिंहावरी तू सुहास्य वदनी अष्टभुजा तू शांकबरी, वास तुझा राहे भक्ताघरी
भृगुकुलाची तू गे लक्ष्मी ,भ्रार्गवरामाची तू गे जननी
वास तुझा राहे मातापुरी
महालक्ष्मी तू करवीर क्षेत्री जन वदती अंबाबाई
भुक्ती मुक्ती देशी तूची सत्वरी
अनुभूतीच्या प्रार्थनेसाठी प्रकटली त्वरीत तुळजापुरी
आदिमाया तू भवानी गौरी
सात मातृका सप्तश्श्रुगी भक्त भ्रमर घाली रुंजी
अष्टदशाभुजा गडावरी
No comments:
Post a Comment