Saturday, July 20, 2013

महाराष्ट्रामधील साडेतीन शक्तिपीठे

) कोल्हापूरची महालक्ष्मी (अंबाबाई)
) माहूरगडची रेणुका (एकविरा, यमाई)
) तुळजापूरची भवानी
) वणीची सप्तशृंगी
हि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे होत.
हि साडेतीन शक्तिपीठे म्हणजे काराचे सगुण रूप आहे. कार म्हणजे प्रणव म्हणजेच परमात्म्याचे साकार आणि प्रकट रूप मानले जाते. कारामध्ये सार्धत्रय (साडेतीन) मात्रा आहेत. त्याप्रमाणेच साडेतीन शक्तिपीठे क्रमशः अशी आहेत :
) मातापूर
) तुळजापूर
) कोल्हापूर
) सप्तशृंगी
''कार पीठ माहूर ''कार पीठ तुळजापूर ''कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी.
सप्तश्रुंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून अर्धपीठ. सात शिखरांच्या समुदायास सप्त श्रुंग म्हणून ओळखले जाते. यातील एका अतियूच्च शिखरावार देवीचे मूळ स्थान आहे. पण ते ठिकाण अतिशय दुर्गम असल्यामुळे वर्षातून एकदा चैत्रपौर्णिमेला ध्वज लावण्यासाठी एकच व्यक्ती मूळ स्थानाला जाते. पुराणातील वरणनाप्रमाने ह्याच शिखरावर मार्कंडेय ऋषींनी घोर तप केले होते. त्यांच्यावर कृपा करण्यासाठी देवी इथेच प्रकट झाली होती. ते मूळ स्थान अत्युच्च शिखरावरतीच आहे. ह्या ॐकार पर्वतावर चढून जाणे आजही कठीण आहे. मांडूक्य उपनिषदानुसार साडेतीन मात्रा ॐकार स्वरूपी प्रतिक रूप या शक्तीपीठावरती साधना करणार्यांना भक्ती मुक्ती दोन्ही बरोबरच मिळतात.
माहुरची रेणुका महाकाळी पीठ आहे. सप्तशतीच्या प्राधानिक रहस्यात वर्णन केलेल्या महाकालीच्या दहा नावात एकवीरेचे नाव आहे. एकविरा म्हणजेच रेणुका किंवा यमाई होय. कोल्हापूर महालक्ष्मीचे शक्तीपीठ आहे. तुळजा भवानी महासरस्वतीचे रूप आहे. सात मातृका अर्ध मात्रा स्वरूपी अर्ध पीठ सप्तशृंगी आहे.
तुळजा भवानी शिवरायांची आराध्य दैवता महाराष्ट्रातील अनेकांची कुलस्वामिनी आहे. पुराणात या देवीची तीन नावे आढळतात 'त्वरिता', 'तुरजा', ' तुळजा'. त्वरित म्हणजे शीघ्र प्रसन्ना होणारी 'त्वरिता' आणि भक्तांच्या हाके सरशी धावणारी 'तुरजा'. 'तूर' म्हणजे त्वरित + जा म्हणजे जाणारी, त्वरित धावणारी ती ' तुरजा'. ' तुरजा' या शब्दाचा अपभ्रंश 'तुळजा' झाला (-लयोर्भेदः ).
कोल्हापूरला आद्य मातृशक्तीचे मुख्य स्थान म्हणतात. या क्षेत्राला 'महामातृका पीठ' 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते.
श्री महालक्ष्मीच्या मंदिरातील रचना चक्रराज (श्री यंत्र) प्रमाणे सर्वतो भद्र मंडल प्रमाणे आहे. या मंदिरात पाच शिखरे तीन मंडपे आहेत. गर्भ गृह मंडप, मध्य मंडप गरुड मंडप हे तीन मंडप होत. प्रमुख विशाल मंडपा मध्ये १६ x १२८ स्तंभ कलाकुसरींनी युक्त आहेत.
माहूरला मातापूर असे म्हणतात. याच क्षेत्री भगवान दत्तात्रेय नित्य भिक्षाग्रहण (भोजन) करतात. या कुंडातून, सती कुंडातून परशुरामाच्या पुत्र प्रेमापोटी,वात्सल्यापोटी देवी रेणुका प्रकट झाली. इथे केवळ देवीचा चेहराच आहे पूर्ण मूर्ती नाही, केवळ शिरोभागच आहे.
ऋग्वेदातील उषासुक्तामध्ये उशाला आदितीमुखा म्हटले आहे. हिलाच अनार्वा दिव्या गौम्भ नावाने संबोधिले जाते. रेणुका हे देवमाता अदितीचे रूप आहे म्हणून या क्षेत्राला मूळपीठ म्हणतात. वेदात रेणुकेचा उल्लेख नाही पण महर्षी जमदग्नी याचा उल्लेख वारंवार आढळतो. जमदग्नी हा प्रत्यक्ष शिवाचा अवतार मंत्रदंष्ट्रा ब्रह्मर्षी होत. ऋग्वेदाचा दशमंडलाचा द्रष्टा तसेच, उश्मांड हवन विधीचा प्रचारक तसेच ससर्परी विद्या आणि श्राद्ध विधीचा रचयिता महर्षी जमदग्नी हे होत. महर्षी जमदग्नीचे आश्रम रीशिकुल जिथे जिथे होत तिथे तिथे रेणुका मातेचे स्थान आहेत. तरी पण मूळ स्थान म्हणजे सती स्थान माहूर किंवा मातापूर हेच मुख्य आहे. रेणुका हि अग्नी तत्वाशी संबंधित आहे. अग्नी ज्वालावर अधिष्ठित अग्नी ज्वालावर परीवेश्ठीत रूपाचे वर्णन सर्वत्र आढळते त्यामुळे रेणुका हि अग्नी देवता आहे. देव माता अदिती हि प्रलायाग्निवर आरूढ अग्नीवलयांकित आहे. त्या प्रमाणे चीदग्नी अग्नी संभवा रेणुका जमदग्नी बरोबर विवाह बद्ध झाली. सूर्य अग्नी देव तिच्या पोटी पुत्र रूपाने अवतरले. विवाहाच्या वेळी दोघांनी श्रवताग्नी चेताग्निचे व्रत ग्रहण केले शेवट पर्यंत ते व्रत केले. शेवटी हि अग्नीच्या चिताग्नी मध्ये लुप्त झाली पुन्हा अग्नी मधून प्रगटली भक्त कल्याणासाठी शाश्वत रुपात प्रतिष्ठित झाली ते क्षेत्र म्हणजे माहूर. भगवती अदिती रेणुका, मूळशक्ती, अनादी शक्ती पराब्रःमेची महाशक्ती आहे. दशावतारा मध्ये वामन परशुराम हे दोन अवतार ब्राह्मण कुलसंभूत अवतार आहेत. दोघांची माता अदिती रेणुका होय. परशुरामाच्या कारणामुळे पुत्र वत्सला पृथ्वीवर सदैव अधिष्ठित रेणुका हीच होय. सर्व देवी देवता अवतार कार्य समाप्ती नंतर निजधामास गेले पण रेणुका देवी अंतर्धान पावल्यावर मातेच्या ममतेने पुन्हा पृथ्वीवर प्रगटली ती कायमचीच.

स्वतः आदीशक्ती स्वरूपिणी , पतीदेव साक्षात शिव आणि पुत्र परशुराम म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार, हा त्रिवेणी संगम. आदिशक्ती सती जाताना प्रत्यक्ष महाविष्णू(परशुराम) मंत्राग्नी देत आहेत. सृष्टी संचालक त्रिदेव दत्तात्रेय सती कर्माचे पौरोहित्य करीत आहेत असा अद्भुत प्रसंग विरळाच.

सतीच्या शरीराचे श्री विष्णूंनी सुदर्शन चक्राने तुकडे केले ते जिथे जिथे पडले ती सर्व ठिकाणे शक्तिपीठे बनली. माहूर क्षेत्री सतीचे स्तनद्वय पडले. मातृदेहा मध्ये वात्सल्य रसाचे स्थान म्हणजे स्तनद्वय किंवा पयोधर होय. या मातृत्वाच्या वात्सल्याचे मूळ ठिकाण म्हणजे पुरःस्थल म्हणजेच माहूर.

Wednesday, October 19, 2011

Sunday, October 16, 2011

shree durgaa stotram

ॐश्री दुर्गा पञ्जर स्तोत्रम्
हे देवी ,
तुझी गुण संपदा अपार आहे .गुणाच्या या कोशात तुझे रूप सामावले आहे .ज्यांनी ध्यान योगाची साधना केली त्याना तू दर्शन दिलेस .ईश्वराच्या अंगी असणारी मूर्तिमंत शक्ती तूच आहेस .हे सर्वेश्वरी ,हे मोक्ष दायिनी माझे रक्षण कर .
हे देवी ,
तू देवाचे सामर्थ्य आहे .तू आत्म्याचे बळ आहेस . वेदांनी तुझा असा महिमा गायला आहे .मोठ्या तपस्वी मुनी जनाच्या समोर तू अवतीर्ण झालीस . तू परम गूढ आहेस , तू सर्व व्यापी आहेस तू संत तत्वाचे अधि ष्ठान आहेस . हे सर्वेश्वरी ,हे मोक्ष दायिनी माझे रक्षण कर .
हे देवी ,
तू परब्रह्माच्या विविध शक्तीचा स्त्रोत आहेस . श्वेता श्वेतर उपनिष दाच्या शब्दामधून तुझ्या रूपाचे कला कल्मष झाले आहेस .ज्ञान .बळ आणि क्रिया तुझ्या स्वरूपातून आपोआप प्रगट होतात .हे सर्वेश्वरी ,हे मोक्ष दायिनी माझे रक्षण कर
.हे देवी ,
कूर्म आणि मत्स्य पुराणात तुला देव आणि आत्मा असे संबोधिले आहे . तू साक्षात सदाशिवाचा आत्मा आहेस .भव पाशातून तू मानवाला मुक्त करतेस .हे सर्वेश्वरी ,हे मोक्ष दायिनी माझे रक्षण कर .
हे देवी ,
तू ब्रह्म तत्वाचा अंतरात्मा आहेस . तू अनेक रूपे धारण करतेस .मयुरी या नावाने तू विख्यात आहेस .तू अर्जुनाला गीतेचा उपदेश केलास . जगातील सर्व ज्ञानाचा तू आत्मा आहेस . हे सर्वेश्वरी ,हे मोक्ष दायिनी माझे रक्षण कर
भक्तानो ,
देवी स्तीत्राच्या अर्थाचे मनन करा .देवीची मनोभावे प्रार्थना करा . त्यामुळे तुमचे चित्त शुद्ध होईल . तुमचे जीवन मांगल्य मय होईल .तुमच्या जीवनाचे साफल्य होईल .
श्री दुर्गायै नमः इति श्री चंद्र शेखरेंद्र स्वामी रचित श्री दुर्गा स्तोत्रम संपूर्ण

Sunday, October 2, 2011

Sunday, June 5, 2011