Wednesday, October 19, 2011

Sunday, October 16, 2011

shree durgaa stotram

ॐश्री दुर्गा पञ्जर स्तोत्रम्
हे देवी ,
तुझी गुण संपदा अपार आहे .गुणाच्या या कोशात तुझे रूप सामावले आहे .ज्यांनी ध्यान योगाची साधना केली त्याना तू दर्शन दिलेस .ईश्वराच्या अंगी असणारी मूर्तिमंत शक्ती तूच आहेस .हे सर्वेश्वरी ,हे मोक्ष दायिनी माझे रक्षण कर .
हे देवी ,
तू देवाचे सामर्थ्य आहे .तू आत्म्याचे बळ आहेस . वेदांनी तुझा असा महिमा गायला आहे .मोठ्या तपस्वी मुनी जनाच्या समोर तू अवतीर्ण झालीस . तू परम गूढ आहेस , तू सर्व व्यापी आहेस तू संत तत्वाचे अधि ष्ठान आहेस . हे सर्वेश्वरी ,हे मोक्ष दायिनी माझे रक्षण कर .
हे देवी ,
तू परब्रह्माच्या विविध शक्तीचा स्त्रोत आहेस . श्वेता श्वेतर उपनिष दाच्या शब्दामधून तुझ्या रूपाचे कला कल्मष झाले आहेस .ज्ञान .बळ आणि क्रिया तुझ्या स्वरूपातून आपोआप प्रगट होतात .हे सर्वेश्वरी ,हे मोक्ष दायिनी माझे रक्षण कर
.हे देवी ,
कूर्म आणि मत्स्य पुराणात तुला देव आणि आत्मा असे संबोधिले आहे . तू साक्षात सदाशिवाचा आत्मा आहेस .भव पाशातून तू मानवाला मुक्त करतेस .हे सर्वेश्वरी ,हे मोक्ष दायिनी माझे रक्षण कर .
हे देवी ,
तू ब्रह्म तत्वाचा अंतरात्मा आहेस . तू अनेक रूपे धारण करतेस .मयुरी या नावाने तू विख्यात आहेस .तू अर्जुनाला गीतेचा उपदेश केलास . जगातील सर्व ज्ञानाचा तू आत्मा आहेस . हे सर्वेश्वरी ,हे मोक्ष दायिनी माझे रक्षण कर
भक्तानो ,
देवी स्तीत्राच्या अर्थाचे मनन करा .देवीची मनोभावे प्रार्थना करा . त्यामुळे तुमचे चित्त शुद्ध होईल . तुमचे जीवन मांगल्य मय होईल .तुमच्या जीवनाचे साफल्य होईल .
श्री दुर्गायै नमः इति श्री चंद्र शेखरेंद्र स्वामी रचित श्री दुर्गा स्तोत्रम संपूर्ण

Sunday, October 2, 2011