Tuesday, April 26, 2011

karavirkshetra

करवीर क्षेत्र म्हणजेच दक्षिण काशी व साडे तीन पीठातील प्रमुख पीठ अर्थात कोल्हापूर महालक्ष्मी होय .या क्षेत्राच्या पूर्व दिशेला रामेश्वर महादेव आळते येथे असून पश्चिमेला चटकाई -मटकाई डोंगरावर सिद्ध बटुकेश्वर आहे.दक्षिण दिशेला तिटवे येथे चक्रेश्वर महादेव तर उत्तरेला गॉटखिंडी येथे मल्लिकार्जुन महादेवाचे स्थान आहे.पूर्वेला उजळाई देवी .दक्षिणेला कात्यायनी देवी ,उत्तरेला केदार व शाकंबरी देवी पश्चिमेला असून हे क्षत्र काशीपेक्षा श्रेष्ठ आहे येथे श्री विष्णू महालक्ष्मीच्या रुपात असून डोकीवर मातुलिंग आहे या ठिकाणी भुक्ती व मुक्ती या दोन्ही मिळतात असा उल्लेख पुराणात मिळतो.बत्तीस शिराळा याला पूर्वीचे नाव श्री आलंय असे होते .